Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारकडे सगेसोयेरेची मागणी केली. यासाठी आता सरकारने एका महिन्याचा अवधी मागितला आहे. मात्र अशातच आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं आहे. यावर प्रतिक्रिया देत मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन ही पेंद्या-सुदाम्याची जोडी. व्यवसायावर आरक्षण दिले आहे मग, मराठ्यांना आरक्षण का नाही?. आम्हाला राजकारणात जायचे नाही, पण 13 तारखे पर्यंत आरक्षण दिले नाही तर पुढची भूमिका ठरवू, असं जरांगे म्हणालेत.
“13 तारखेपर्यंत मी सरकारवर विश्वास ठेवणार”
13 तारखेपर्यंत मी सरकारवर विश्वास ठेवणार. फडवणीस यांच्यावर माझा विश्वास. आम्हाला भिडवत ठेवतील तर हे पडतील. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर 20 वर्ष यांना रुळावर येऊ देणार नाही, असं म्हणत जरांगेंनी फडणवीसांना इशारा दिलाय.
आम्ही हाके यांना विरोधक मानत नाही, त्यांनी त्यांचे आंदोलन करावे. सग्या सोयऱ्याची आम्ही दिलेल्या व्याख्ये प्रमाणे घेतले तर आम्हाला मान्य. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आम्ही आदर करतो. म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता, असं जरांगे म्हणालेत.
Manoj Jarange | “ते माझ्या समोर येऊन सिद्ध करा”
तुम्हाला सग्या सोयऱ्याची व्याख्या ठेवायची असेल तर अ, ब, क, ड करा. आमच्या व्याख्येप्रमाणे सग्या सोयऱ्याची अमलबजावणी केली नाही, तर ते आम्हाला मान्य नाही. त्यांनी पाठवलेल्या चार न्यायमूर्तींना कळत नव्हते असे गिरीश महाजन यांना म्हणायचे आहे का?आरक्षण सरकारला टिकू द्यायचे नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आणि कुणबी एक नाही हे माझ्या समोर येऊन सिद्ध करावे. ज्याला घ्यायचे त्याने कुणबी प्रमाणपत्र घ्यावे. मराठा आणि कुणबी एकच आहे आणि त्यामुळे सरसकट द्या, असंही जरांगे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
बहुचर्चित ‘मुंज्या’चा थरार आता ओटीटीवर दिसणार; कधी आणि कुठे पाहणार?
“हिंमत असेल तर…”, संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलं चॅलेंज
यंदा वटपौर्णिमा 4 दुर्मिळ योगायोगाने साजरी करा; होणार दुहेरी लाभ
रिल्सच्या नादात जीवघेणा स्टंट; तरूणीचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल
“पाच महिन्याची गरोदर आहेस, हे शोभतं का तुला?”; दीपिकाच्या ‘त्या’ कृत्यावर नेटकरी भडकले