“ठाकरे, पवार, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा..”; जरांगे पाटील यांचा थेट इशारा

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैरोजी आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांनंतर म्हणजेच 24 जुलैरोजी त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. त्यांनी येत्या 13 ऑगस्ट पर्यंत राज्य सरकारला वेळ दिला आहे. अशात त्यांनी (Manoj Jarange) मविआ नेत्यांवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा,असं जरांगे म्हणाले आहेत.

मविआ नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा..

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही, याबाबत उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा. त्यांनी विरोधकांची वाट बघू नये, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला. “भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचं राजकीय करिअर मराठा संपवून टाकेल.”, असा इशारा यावेळी जरांगे (Manoj Jarange) यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

मनोज जरांगे पुढील उपोषण कुठे करणार?

तसंच पुढे ते म्हणाले की, सध्या पाऊस सुरू आहे. सरकार त्यात व्यस्त आहे. त्यामुळे त्यांना आम्ही त्रास देत नाही. 29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आणि त्यावेळी ठरवणार विधानसभा निवडणुक लढवायची की नाही, मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही, असं वक्तव्य मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलं आहे.

दरम्यान, जरांगे यांनी मागे माध्यमांशी संवाद साधताना पुढील उपोषण येवल्यात करेन, असा इशाराच छगन भुजबळांना दिला होता. यानंतर आता येवला तालुक्यातील पुरणगाव आणि एरंडगावच्या ग्रामस्थांनी मनोज जरांगेंनी पुढील उपोषण येवल्यात करावे, अशी मागणी केली आहे.त्यामुळे जरांगे पाटील यांचे पुढील उपोषण येवल्यात होणार का?, हे आता पहावे लागेल.

News Title –  Manoj Jarange warning to MVA leaders

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद, प्रवाशांचे प्रचंड हाल

“माझी हात जोडून विनंती…”; महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहता राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

पुण्यावर जलसंकट! रस्त्यांना नदीचे रूप, अनेक इमारती पाण्याखाली; पाहा Video

पूरजन्य परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला नागरिकांना धीर; म्हणाले..

“माझी तीन दुकानं बुडाली, त्याचा खर्च कोण देणार?”; संतप्त पुणेकराचा सवाल