“नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नयेत, नाहीतर..”; जरांगे पाटील यांचा थेट इशारा

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता भाजपचे नेते नारायण राणे यांच्यावर निशाण साधत त्यांना थेट इशारा दिला आहे. मी बोलायला लागलो, तर आखडता घेणार नाही. त्यामुळे निलेश साहेबांनी (निलेश राणे) त्यांना समजून सांगावे, असं जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत. आज (4 ऑगस्ट) ते माध्यमांशी संवाद साधत होते.

“नारायण राणेंनी किंवा इतर कुणी मला फुकट धमक्या देऊ नयेत. मी कुणालाही भीत नाही. मी ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. माझा मराठा समाजही ओबीसीमधूनच आरक्षण घेणार आहे.”, असं जरांगे म्हणाले आहेत.

मनोज जरांगे यांची नारायण राणेंवर टीका

तसंच, आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो. पण, नवीन काय काढत आहेत? माहीत नाही. गोरगरीबांची सत्ता आणावी असं मला वाटतं. गरीबांचं कल्याण घडायचं असेल तर सत्तेवरही तेच लोक बसले पाहिजे, असं मनोज जरांगे (Manoj Jarange)म्हणाले.

पुढे जरांगे म्हणाले की, “आपलं सरकार जातं की राहतं याची त्यांना चिंता वाटू लागली आहे. रात्रंदिवस हे भाकरी खातच नाहीत बहुदा ताकच पितात. मला उचकवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी त्यांचासारखा स्वाभिमान गहाण ठेवणारा नाही. याचे पाय चाट, त्याचे पाय चाट हे मी करणार नाही.”, असा टोला जरांगे यांनी लगावला.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

“मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. ते फडणवीसांवर बोलले तर आम्ही बोलणारच.”, असं नारायण राणे म्हणाले होते. त्यावरच आज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे यांनी मला फुकट सल्ला देऊ नका, अन्यथा मी आखडता घेणार नाही. असा इशाराच राणे यांना दिला आहे. आता यावर नारायण राणे काय प्रत्युत्तर देणार, ते पाहावं लागेल.

News Title :  manoj jarange warning to narayan rane

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यातील 20 धरणे तुडुंब भरली; ‘या’ गावांना सावधानतेचा इशारा

रोज सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे!

पुणेकरांनो सतर्क राहा! पावसाचा जोर वाढला, खडकवासलातून पाण्याचा ‘विसर्ग’ वाढवणार

“…तर आपल्या आई-बहि‍णींना फिरणं मुश्किल होईल”; देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोनं झालं स्वस्त, 10 ग्रॅमसाठी आता..