नवी दिल्ली | मानवाधिकाराच्या रक्षणासाठी विशेष काम करणार असून देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही, असं नवनियुक्त लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटलं आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांनी नॅशनल वाॅर मेमोरिअलला भेट दिली. येथे त्यांनी शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
नरवणे यांनी मंगळवारी भारताच्या लष्करप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. ते देशाचे 28 वे लष्करप्रमुख ठरले आहेत. त्यांनी लष्करात 37 वर्ष सेवा बजावली असून त्यांनी लष्करात विविध पदांवर काम केलं आहे. विशेष म्हणजे नरवणे पुण्याचे असून त्यांचे शिक्षण पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये झाले आहे.
माझी जबाबदारी अधिक योग्यरित्या पेलता यावी यासाठी मी देवाकडे शक्ती आणि साहस देण्याची प्रार्थना करत आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, बिपिन रावत लष्करप्रमुखाच्या पदावरुन निवृत्त झाले आहेत. रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी( चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली आहे. या पदावर विराजमान होण्याचा पहिला मान त्यांना मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“…तेच ठाकरे आज रामदास कदमांवर थुंकले” https://t.co/9kF3Rc8sHe @OfficeofUT @uddhavthackeray @ShivSena @meNeeleshNRane @BJP4Maharashtra #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
दंगल घडवण्याचा डाव आम्ही उधळला- प्रकाश आंबेडकर- https://t.co/chlae20nxT @Prksh_Ambedkar
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
जे सरकार सत्तेत असेल त्यांच्या आदेशानुसार आम्हाला काम करावं लागतं- बिपिन रावत https://t.co/DKFoVGObxR #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 1, 2020
Comments are closed.