मुंबईविरुद्धच्या विजयाचं श्रेय महेंद्रसिंग धोनीला -तिवारी

Photo- BCCI

पुणे | पुण्याने मुंबईला हरवून आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली, मात्र या विजयाचं श्रेय मनोज तिवारीनं महेंद्रसिंग धोनीला दिलंय. 

बुमराच्या गोलंदाजीवर मोठे फटके खेळणं खूपच अवघड असतं. मात्र धोनीने ते लिलया करुन आपली गुणवत्ता सिद्ध केलीय, असं मनोज तिवारीनं म्हटलंय.

मुंबईविरुद्ध धोनी आणि तिवारीनं ४४ चेंडूत ७३ धावांची भागीदारी केली होती. यातील ४१ धावा त्यांनी शेवटच्या २ षटकांमध्ये केल्या होत्या.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या