Top News देश

जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी वर्णी लागलेले मनोज सिन्हा कोण आहेत? जाणून घ्या…

नवी दिल्ली | बुधवारी सायंकाळी गिरीश चंद्र मुर्मू यांनी जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. गुरुवारी सकाळी राष्ट्रपती भवनातून मनोज सिन्हा यांना केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

पूर्व केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मनोज सिन्हा यांना केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरचे नवे राज्यपाल झाले आहेत. ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. कलम ३७० काढल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन्हींना दोन वेगळ्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्यात आले होते. मुर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी राज्यपाल पदाची शपथ घेतली होती.

कोण आहेत मनोज सिन्हा-

मनोज सिन्हा हे भारतीय जनता पार्टीचे तीन वेळा लोकसभेचे खासदार आहे. उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पार्टीचा मोठा चेहरा आहे. ते नुकतेच २०१९ मधील लोकसभेच्या निवडणूकीमध्ये पराभूत झाले होते. यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळाली नव्हती. मोदी सरकार यांच्या कार्यकाळात ते रेल्वेतसंच माहिती प्रसारण राज्यमंत्री होते.

उत्तर प्रदेशात २०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला होता, तेव्हा मनोज सिन्हा हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत पुढे होते. पण भाजपच्या वतीने योगी आदित्यनाथ यांना पुढे केले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांच्यासाठी तो मोठा धक्का मानला गेला,

मुर्मू हे गुजरात केडरचे १९८५ वर्षातील आयएएस अधिकारी आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासातील अधिकारी मानले जातात. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते त्यांचे प्रमुख सचिव होते. मुर्मू हे केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरचे पहिले लेफ्टनंट राज्यपाल होते.

महत्त्वाच्या बातम्या-

माझं दैवत गेलं…. अनिलभैय्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचा आमदार ढसाढसा रडला…!

भूमीपूजन सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले….

धक्कादायक! सांगली जिल्हा कारागृहातील तब्बल 63 

राम मंदिरावर ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री गडकरींची पहिली प्रतिक्रिया

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या