नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बागमध्ये गेल्या महिन्याभरापासून महिलांचं ठिय्या आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी भाष्य केलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
शाहीन बागमध्ये महिला आणि लहान मुले आहेत. ते नसते तर आम्ही 2 तासात शाहीन बाग रिकामं केलं असतं, असं मनोज तिवारी म्हणाले आहेत. लहान मुले आणि महिलांना हात लावणे आमची संस्कृती नाही, असंही तिवारी म्हणाले आहेत.
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यांविरोधात देशात अशांतता आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. अनेक लोक याविरोधात निदर्शने करत आहेत. मात्र, भाजपने सीएएला विरोध करणाऱ्यांवर टीका केली आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर 11 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे बघावं लागेल.
ट्रेंडिंग बातम्या-
भाजपसोबत पुन्हा युती करणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…
मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा!
महत्वाच्या बातम्या-
डॅडींना पुन्हा सुट्टीवर जायचंय; जाणून घ्या कारण…
मोदींनी राम मंदिरासाठी ट्रस्टची घोषणा करताच उद्धव ठाकरे म्हणाले…
बरं झालं माझ्या आई-बाबांचा घटस्फोट झाला- सारा अली खान
Comments are closed.