बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा’; मनसे नेत्याच्या सूचक ट्विटने खळबळ

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे राज्यात सत्तांतर झालं. नवीन सरकार अस्तित्वात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्येतीच्या कारणामुळे ते कोठे बाहेर पडले नव्हते. याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यात शिंदे गट मनसेत विलीन होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. यावर राज ठाकरेंनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर विचार करू, असं स्पष्ट सांगितलं होतं.

यानंतर काल पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. राज ठाकरेंच्या वक्तव्याला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘याला केमिकल लोचा झाला आहे’, असा टोला लगावला होता. यावर आता मनसैनिकाने एक सूचक ट्विट् करत शिवसेनेला उत्तर दिलं आहे. ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा’, असं ट्विट मनसेचे संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरेचं पुढे नेणार आहेत, असा दावा देशपांडेेेंनीे केला आहे. बाळासाहेबांच्या विचारावर कोणाचाही मालकी हक्क नाही. ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या पक्षाला विरोध केला त्यांच्यासोबतच तुम्ही गेला. यानंतरही बाळासाहेबांचे विचार तुम्ही आचरणात आणले का? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे. सध्या शिवसेनेवर आलेल्या या वेळेचं क्रेडिट (Credit) त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.

दरम्यान, केमिकल लोचा झाला आहे, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यालाही त्यांनी उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री (Environment Minister) असताना काय काम केलं याची चौकशी केंद्र सरकार करत आहे. त्यावेळी कोणाचा लोचा झाला हे स्पष्ट होईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या

बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पहिला प्रोमो आला समोर

15व्या राष्ट्रपती म्हणून दौपदी मुर्मूंनी घेतली शपथ, सर्वोच्चपदी झाल्या विराजमान

‘त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड

‘पक्ष पळवला आता वडील पळवत आहात, तुम्ही बंडखोर नव्हे दरोडेखोर’; उद्धव ठाकरे आक्रमक

सूड, हल्लाबोल, गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More