महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वळवले; मनसेचा आरोप

मुंबई |  महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वळवले आहे, असा गंभीर आरोप मनसेने केला आहे.

मुख्यमंत्री जाहीर भाषणात खोटी बातमी देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी 46 टीएमसी पाणी गुजरातला वळवळे आहे, असा गंभीर आरोप मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ असल्याने शेतकरी हैराण आहे. तरीही महाराष्ट्राचे पाणी गुजरातच्या शेतकऱ्यांना पुरवलं जात आहे, असंही भोसले म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना खूष करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे हे प्रयत्न सुरु आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-आतिशी यांचा भाजपवर आक्षेपार्ह पोस्टर्स वाटल्याचा आरोप; दिल्लीच्या विद्यार्थीनींनी केला भाजपचा निषेध

-23 मे नंतर मी बारामतीत गुलाल उधळायला जाणार- चंद्रकांत पाटील

-अरविंद केजरीवालांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध केले तर मी फासावर जाईन- गौतम गंभीर

-ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रियांका गांधींनी मान्य केली आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक

-जेव्हा राहुल गांधी बिघडलेलं हेलिकॉप्टर दुरुस्त करतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या