मुंबई | नवी मुंबई येथील कामोठे येथे खंडणी मागितल्याप्रकरणी मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मिलींद खाडे असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे.
कामोठे येथे राहणारे धर्मा जोशी यांनी घराचे बांधकाम करताना काही झाडे कापली होती. खाडे यांना ही बातमी कळताच त्यांनी त्या ठिकाणचे फोटो मिळवले.
पनवेल महापालिकेद्वारे कठोर कारवाई करुन सदर बातमी सर्व वर्तमानपत्रात छापून आणेल, अशी धमकी देत खाडे यांनी जोशी यांच्याकडे 6 लाखांची मागणी केली.
यासंबंधी जोशी यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. यावरुन पोलिसांनी खाडे यांना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
–नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ‘राफेल’चं भूत, ‘हिंदू’च्या बातमीने भाजपचे कंबरडे मोडले!
–“आम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष तरी खड्डे पडणार नाहीत”
–बिहारचे युवक नसते तर महाराष्ट्राचे कारखाने बंद झाले असते- सुशीलकुमार मोदी
-कोल्हापूरची जागा काँग्रेसनं स्वत:कडे घ्यावी- सतेज पाटील
–अटलजी ‘महाभेसळी’चं सरकार चालवायचे काय?; काँग्रेसचा मोदींवर पलटवार
Comments are closed.