बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का?”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारने लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला महाविकास आघाडीतील पक्षांसह इतर सर्वच मित्रपक्षांनी पाठींबा दिला आहे. मात्र भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केल्याचं दिसून येतंय. भाजप आणि मनसेच्या काही नेत्यांनी या बंद संदर्भात सरकारवर टिका केली आहे. त्यातच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंदवरून ठाकरे सरकारवर सडकून टिका केलीये.

देशपांडे म्हणाले,”संसदेत शेतकरी कायदा बिल पास होताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? पवार साहेब संसदेत उपस्थित नव्हते. त्याचं कारण काय? त्यावेळी शिवसेना खासदारांची तोंडे बंद का होती? आधीच लोकांचं कंबरडं मोडलं आहे. त्यात सणासुदीच्या काळात थोडाफार फायदा होणार होता. तर अशा दिवसात तुम्ही बंद करता आहात, हा सेट स्पॉन्सर्ड बंद आहे”. असा आरोपही त्यांनी यावेळी सरकारवर लावला आहे.

याशिवाय ते म्हणाले, पोलिस लोकांची दुकानं बंद करत आहेत. ही कुठली बंदची पद्धत. मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा उत्तरप्रदेश सरकारने उत्तरप्रदेश बंद केला का? लॉकडाऊन उठविण्यासाठी तु्म्हाला हफ्ते द्यायचे आणि बंदही पाळायचा, ही कसली दुटप्पी भुमिका? लोकांच्या मनात हा बंद असेल तर तो दिसेल. मात्र स्टेट स्पॉन्सर्ड बंद असेल तरी तो दिसणार. पोलिसांच्या बळावर तुम्ही बंद पाळायला लावणार असाल तर त्याला काय अर्थ आहे? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षाच्या प्रतिनिधींनी शनिवारी पत्रकार परिषद घेउन या बंदची घोषणा केली होती. त्यासोबतच हा बंद सरकारकडून जाहिर केलेला नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. त्यानुसार आता महाराष्ट्रात सर्वत्र बंद पाळला जात आहे. या बंदला अनेक संघटनांनी पाठींबा दिल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील कार्यकर्ते जागोजागी जाऊन बंदला सहकार्य करण्याचं आवाहन करत आहेत. पुण्यातही पीएमपीएल सेवा दुपारी 12 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पीएमपीएल प्रशासनाने घेतला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! महाराष्ट्र बंदमुळे पुण्यातील PMPML प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

“लखीमपूरची चर्चा करूच पण इथल्या शेतकऱ्यांना मदत कधी देणार?”

चिंताजनक! मुंबईमध्ये पुन्हा कोरोना फोफावण्याचा धोका

राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे!

‘मी त्यालाही ओळखत नाही आणि कुठल्या अभिनेत्यालाही ओळखत नाही, पण…’

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More