नाशिक महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का!

जळगाव | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 12 नगरसेवकांनी सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुका तोंडावर असताना नगरसेवकांच्या या निर्णयामुळे मनसेला मोठा धक्का बसल्याचं समजतंय.

मागील निवडणुकीत जळगावात मनसेच्या जिल्हाप्रमुख ललित कोल्हे यांनी स्वत:सह 12 नगरसेवक निवडून आणले होते. मात्र मध्यंतरी त्यांनी मनसेतील सर्व पदांचा राजीनामा दिला आणि खान्देश विकास आघाडीच्या पाठिंब्यावर महापौर झाले.

दरम्यान, या आगामी निवडणुकीत ललित कोल्हे कोणती भूमिका बजावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-… तर खासदारकीचा राजीनामा देईन- नारायण राणे

-घटस्फोटित पत्नी व मुलाला सांभाळणे ही पतीचीच जबाबदारी!

-5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला?

-लोकसभा लढवायची की नाही? राज ठाकरेंनी घेतली शाळा!

-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या