पृथ्वी शॉला मनसेच्या धमक्या; काँग्रेस खासदाराचे गंभीर आरोप

पाटणा | भारतीय संघाचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ हा मुळचा बिहारचा आहे. हे त्यानं सांगू नये म्हणून मनसे त्याला धमकावत असल्याचा आरोप बिहारचे खासदार आणि काँग्रेस नेते अखिलेशप्रसाद सिंह यांनी केला आहे. 

बिहारी लोकांना चुकीची वागणूक दिली जाते. सध्या संघात आलेला पृथ्वी मुळचा मानपूरचा आहे. मात्र हे सांगितलं तर खेळू देणार नाही, अशी धमकी त्याला आणि त्याच्या कुटूंबाला दिली जात आहे, असं त्यांनी म्हटलं. 

गुजरातमध्ये बिहारींना मुद्दाम लक्ष्य केलं जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान, मनसेने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच खरं जाणून घ्यायचं असेल तर पृथ्वीच्या घरच्यांना विचारा, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-सलमान आणि त्याच्या भावांनी माझ्यावर रेप केला, माझ्या वडिलांचा खून केला!

-जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची जबरदस्त ऑफर

-रावण महात्मा; रावण दहनाची प्रथा बंद करण्याची मागणी

-दक्षिण भारतापेक्षा मला पाकिस्तान अधिक जवळचा- नवज्योत सिंग सिद्धु

-राम कदमांचा व्हीडिओ; मतदार होण्यासाठी तरूणांना अमिष