सरकारचं नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही, उद्या नाक दाबणार- मनसे

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांनी वेतनासंदर्भात पुकारलेल्या संपात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. मनसे सरचिटनिस संदिप देशपांडे यांनी संपावर तोडगा काढण्याचा सरकारला इशारा दिला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. मात्र सरकारला यातून तोडगा काढता आला नाही. सरकारचं नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

उद्यापासून सरकारचं नाक दाबायला सुरुवात करणार, सरकारने परिणाम भोगण्यास तयार राहावे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवा वेतन करार आणि कनिष्ठ  क्षेणीबाबतच्या मागणीसाठी बेस्टच्या 32 हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-… म्हणून काँग्रेसने चक्क पतंगावरच छापले राफेल प्रकरणाचे प्रश्न!

-केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीनंच फुंकलं वडिलांविरोधात निवडणुकीचं रणशिंग

-“सवर्णांना दिलेलं 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार का”??

-“बाबा तुम्ही राबडी देवींची माफी मागा”

-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या मुलीचं अपहरण करण्याची अज्ञाताकडून धमकी