बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हा केवळ योगायोग आहे की, मुख्यमंत्र्यांचं इटलीसोबतच लांगुलचालन?”

मुंबई | शिवसेना आणि मनसे हा वाद मागील काही दिवसांपासून वाढतानाच दिसतो आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच आता मनसेने शिवसेनेवर अजून एका मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी यावेळी ठाकरे सरकारला एक खोचक प्रश्न विचारला आहे.

दादरच्या शिवाजी पार्क येेथे मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे इटलीवरून मागवण्यात आले आहेत. त्यावर मनसेचे संदिप देशपांडे यांनी आक्षेप घेत इटलीवरून दिवे आयात करण्यामागे नेमकं काय कारण आहे? असा खोचक सवाल ट्विटरद्वारे विचारला आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र यासाठीचे दिवे इटलीवरून मागवण्यात आले आहेत.  हा केवळ योगायोग आहे की, मुख्यमंत्र्यांचं इटलीसोबतच लांगुलचालन?” असा प्रश्न विचारत त्यांनी मुख्यमंत्र्याना टोला लगावलाय.

याशिवाय इतरही सवाल त्यांनी विचारले आहेत. भारतात चांगले दिवे बनवले जातात मग इथल्या दिव्यांचा काय प्रॉब्लेम आहे? नेहमी परदेशी कंपन्यांमधून वस्तू का मागवल्या जातात?, असा सवाल विचारत त्यांनी शिवसेनेवर टिका केली आहे. यातून शिवसेनेचं इटलीप्रेम दिसून येतं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पुणेकरांना दिवाळीत मिळणार म्हाडाचं गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा

“भाजप हा बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या लोकांचा, ध्येयधोरणे नसलेला पक्ष”

क्रेडीट कार्डवर मिळणारे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

इंधन दरवाढीला अखेर लगाम, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे दर

“इंधन दरवाढीविरूद्ध आंदोलन करणारे कोणत्या बिळात लपुन बसले आहेत?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More