बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यंदा देशात चांगला पाऊस; स्कायमेटचा अंदाज

मुंबई | बळीराजासह सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा देशात समाधानकारक पाऊस राहील, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं वर्तवला आहे.

सध्याची हवामानाची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरून सरासरीच्या 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. जून महिन्यात सर्वाधिक तर ऑगस्टमध्ये सर्वात कमी पाऊस पडणार आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात सामान्य तर मराठवाड्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दुष्काळी परिस्थिती उद्धवण्याची शक्यता नाही, असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय. 

महत्त्वाच्या बातम्या-

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More