मुंबई | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार आढळून आली होती. स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करून जाणाऱ्या लोकांचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात असतानाच स्फोटक असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला होता. आता अखेर त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये त्यांच्या नाका तोंडात पाणी गेलं असून शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याचं सांगितलं आहे.
छातीत काही अंश पाणी आढळलं आहे. नाकातून रक्त आलं होतं आणि शरीराच्या बाहेरील बाजूस कोणत्याही जखमा नाहीत, असं या अहवालात म्हटलं आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी सकाळी नकार दिला होता. जोपर्यंत पोस्टमार्टम अहवाल जाहीर करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मनसुख यांच्या कुटुंबीयांनी मांडली होती.
हिरेन हे उत्तम पोहणारे होते व त्यांना कोणतेही टेन्शन नसल्याने त्यांनी आत्महत्या केली नसून हा खूनच असल्याचा दावा त्यांच्या पत्नी आणि मित्रानी केल्याने खळबळ उडाली आहे.
थोडक्यात बातम्या-
आणीबाणीच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी राहुल गांधींना फटकारलं, म्हणाले…
“…त्या महिलांचीच चुकी आहे; मुंडे, शेख, वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत”
“अशोक चव्हाण ताठर माजी मुख्यमंत्री, गडी ऐकायलाच तयार नाही”
धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप
Comments are closed.