मुंबई | मनसुख हिरेनचा मृतदेह ठाण्यातील रेती बंदरात सापडल्यानं एकच खळबळ माजली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकातल्या प्रमुख साक्षीदाराचा मृत्यू झाल्यानं या प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे. हिरेनची हत्या की आत्महत्या? या प्रश्नाबाबत संभ्रम अद्याप कायम असताना घटनेच्या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शीनं मोठा खुलासा केला आहे.
मनसुख हिरेनचा मृतदेह खाडीच्या किनाऱ्यावर चिखलात सापडलेला होता. तसेच त्याच्या तोंडात जवळपास सहा ते सात रुमाल कोंडलेल्या अवस्थेत असल्याचं घटनेच्या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शीनं स्पष्ट केलं आहे. रेती बंदराच्या खाडीजवळ सध्या रेल्वे ब्रिजचं काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी सुपरवायझर असलेल्या वाघमारे यांना हा खुलासा केला आहे.
रेती बंदराच्या किनारी लघुशंकेसाठी गेल्यावर एका व्यक्तीचा मृतदेह चिखलात पालथ्या अवस्थेत सापडला होता. वाघमारे यांनी वेळ न दवडता त्वरित 100 नंबरला काॅल करून सदर घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि अग्निशामक दलानं चिखलातील मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनाही अपयश आल्यानं शेवटी क्रेनच्या सहाय्यानं मृतदेह बाहेर काढण्यात आला, अशी माहिती सुपरवायझर वाघमारे यांनी दिली आहे.
चिखलातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी भगवान पंडित नामक व्यक्ती सुरवातीला गाळात उतरला होता, भगवाननं हिरेनचा मृतदेह बांधून बाहेर काढण्यात मदत केली. हिरेनच्या तोंडावर मास्क असून सहा ते सात रूमालही कोंबलेल्या अवस्थेत सापडल्याचं भगवाननं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
वडील आणि 84 वर्षीय आजोबांची हत्या करून तरूणाने उचललं धक्कादायक पाऊल!
चांगली खेळी करुनही पदरी निराशा, ‘सुंदर’चं शतक थोडक्यात हुकलं
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोदी सरकारला पुन्हा दणका; दिले ‘हे’ आदेश
स्वॅब न देताच रुग्णाला दिला कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
महाविकास आघाडीला दणका; मुंबई उच्च न्यायालयाने ‘ती’ फेरविचार याचिका फेटाळली
Comments are closed.