मुंबई | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार आढळून आली होती. स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करून जाणाऱ्या लोकांचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात असतानाच स्फोटक असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.
मुंब्रा येथील रेतीबंदराच्या खाडीत हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. मात्र तेव्हा त्यांच्या तोंडावर लावलेल्या मास्कमध्ये खूप सारे हातरुमाल सापडल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं आहे.
पेडर रोडवर असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या घरासमोर त्यांच्या गाडीशी मिळता जुळता नंबर असलेल्या नंबरची स्कॉर्पिओ गाडी नो पार्किंगच्या फलकाखाली लावण्यात आली होती. सदरील गाडीमध्ये 20 जिलेटीनच्या कांड्या आणि एक निनावी पत्र होतं ज्यामध्ये ‘ही फक्त झलक आहे’, असा उल्लेखही करण्यात आला होता. मनसुख हिरेन हे या गाडीचे मालक असल्याचं पोलिस तपासात समोर आलं होतं. हिरेन मुंबई पोलिसांच्या चौकशीला सामोरे गेले होते. गाडी चोरीला गेल्याची तक्रारही त्यांनी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. मनसुख काल रात्रीपासूनच बेपत्ता असल्याची माहिती होती. मात्र आज हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानं या प्रकरणाला वेगळं वळणं लागलं आहे.
दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटल्याचं पहायला मिळालं. अंबानींच्या बंगल्याजवळ सापडलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती ते मनसुख हिरेन कालपासून बेपत्ता असून त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलीये.
थोडक्यात बातम्या-
महाविकास आघाडीतील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण
‘या’ जिल्ह्यातील चार टोळींमधील 18 गुंडांना केलं तडीपार
प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना? – चित्रा वाघ
राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक
मनसुख हिरेनचं नक्की काय झालं? संपूर्ण घटनाक्रम; वाचा सविस्तर…
Comments are closed.