बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आता ‘या’ व्यक्तीची ATS कडून चौकशी

मुंबई | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएसने क्राईम ब्राँचचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. सुनील माने हे मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक आहेत.

दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये मानेंची चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एटीएसच्या हाती महत्त्वाची लीड मिळाली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा ताबा घेण्यासाठी एटीएस कोर्टात प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनीही माध्यमांशी बोलताना यासंबंधी दावा केला होता. आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून एका तावडे नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, असं त्यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार आढळून आली होती. स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करून जाणाऱ्या लोकांचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात असताना स्फोटक असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला. यानंतर या प्रकरणात सचिन वाझेंचं नाव आल्यानं खळबळ उडाली. यानंतर या प्रकरणी दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या- 

“शाळेत डान्सबार, लॉज आणि मद्यविक्रीची परवानगी द्या”

‘लोकसभा निवडणुकीवेळी मला…’; कंगणा राणावतचा मोठा खुलासा

संतापजनक! ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेवर वॉर्ड बॉयने केला बलात्कार!

कोरोनामुळे ‘या’ राज्यातून महाराष्ट्रात जाण्या-येण्यावर निर्बंध; बससेवा केली बंद

मुंबईकरांनी भारतीय संघाला सावरलं, अटीतटीच्या सामन्यात भारताचा इग्लंडवर विजय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More