आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयावर बांधल्या जाळ्या!

मुंबई | मंत्रालयावरुन उडी मारुन होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने चक्क मंत्रालयावर जाळ्या बांधल्या आहेत. प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 

हर्षल रावते नावाच्या तरुणानं नुकतीच मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारली होती. दवाखान्यात नेल्यानंतर त्याला मृत घोषीत करण्यात आलं होतं. या घटनेनं एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, हर्षल रावतेपूर्वी एक युवक मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोरील सज्जावर चढला होता. आता रोज अनेकजण आपली कामं घेऊन मंत्रालयात येत असतात. त्यांनी त्याचं अऩुकरण इतरांनी करु नये, यासाठी या जाळ्या बांधण्यात आल्या आहेत.