मंत्रालयात लवकरच वाहनबंदी, मंत्र्यांच्या गाड्यांवरही निर्बंध

मुंबई | मंत्रालयाच्या आवारात वाहनतळ नसल्यामुळे होणारा गोंधळ लक्षात घेता याठिकाणी लवकरच वाहनबंदी करण्यात येणार आहे. मंत्र्यांसह सर्वच वाहनांसाठी हे निर्बंध असणार आहेत.

प्रवेशबंदीनंतर गाड्यांची सोय व्हावी यासाठी मंत्रालयाच्या आवारात भूमिगत वाहनतळ बांधण्यात येणार आहे. यासंबंधीचा सविस्तर अहवाल तयार करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगण्यात आलं आहे. 

 दरम्यान, मंत्रालयाच्या पायऱ्यावरुन नागरिकांना थेट पहिल्या मजल्यावर प्रवेश करु देण्याची मुभा दिली जाणार आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या