बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मैनू काला चष्मा जचता है’ म्हणत नवरीची लग्न मंडपात धमाकेदार एन्ट्री, पाहा व्हायरल व्हिडीओ

लखनऊ | लग्न म्हटलं आपल्या डोळ्यासमोर मोठा मंडप, खूप साऱ्या लाईटिंग, लोकांची गर्दी,  मुलींच नटनं, मुरडणं हे सगळं येतं. या महाभयंकर कोरोना काळातही लोक लग्नात कोणतीच हौस करायची सोडत नाहीत. लोक लग्न समारंभात पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. म्हणतात ना हौसेला मोल नसतं. तसंच अलिकडच्या काळात अनेकांचे लग्नाचे बार उडाले आहेत.

लग्नातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्रत्येक मुलीची तिच्या लग्नाविषयी काही ना काही करायची इच्छा असतेच. काहींना रजिस्टर वेडींग करायचं असतं. तर काहींना डेस्टिनेशन वेडींग. अशातच एका नवरीच्या एन्ट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

तसेच आपल्याला माहित आहे की, भाऊ आणि बहिणीमधील नातं हे खूप गोड असतंं. मोठा भाऊ आपल्या लहान बहिणीसाठी काहीही करू शकतो. तिची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतो. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील नवरीला आपल्या लग्नात आपली एन्ट्री हटके व्हावी आणि सगळ्यांच्या कायम लक्षात राहावी, असं तिला वाटत होतं. यासाठी नवरीने चक्क गॉगल लावत बुलेटवरून एन्ट्री केली आहे. ती बुलेट त्या नवरीचा भाऊ चालवत असून, त्यानेही गॉगल घातला आहे.

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील असल्याचं समजतंय. नवरीच्या धमाकेदार एन्ट्रीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओ नवरीने ज्याप्रकारे एन्ट्री मारली आहे. तशी या आधी कोणीच एन्ट्री न केल्यानं या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ- 

थोडक्यात बातम्या – 

तहानलेल्या गरूडाची तरूणाने अशा पद्धतीने भागवली तहान, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘उद्धव, मी तुझी शिक्षिका…’; उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटलांना शिकवलेल्या शिक्षिकेची आर्त हाक!

आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; सक्रिय रूग्णसंख्याही घटली

रक्षकच बनला भक्षक! पती कोरोनामुळे रुग्णालयात असल्याची संधी साधत पोलिसाने केला महीलेवर बलात्कार

“भाजपनेच मराठा आरक्षण दिलं आणि संभाजीराजेंना खासदारही केलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More