Top News अहमदनगर महाराष्ट्र

“…तर भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”

अहमदनगर | श्रीरामपूर येथील भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यावर पक्ष संपवण्याचा आरोप करत भाजपच्या 310 पैकी 257 बूथ प्रमुखांनी राजीनामा दिलाय.

ज्यांच्यावर विविध आंदोलनात अनेक गुन्हे दाखल झाले, त्याच लोकांना कार्यकारणीतून वगळले. ज्यांचा समावेश केला त्यांच्याबरोबर मात्र पक्षाचे कोणतेही बूथ प्रमुख अथवा कार्यकर्ते नाहीत. त्यांच्याकडे जनाधार नाही त्यांना पदे दिली गेली. मात्र केवळ निष्ठावंतांना संपवण्यासाठी राजकारण केलं, असा गंभीर ठपका राजेंद्र गोंदकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

अनेकांना जिल्हा आणि तालुका कार्यकारणीत डावलल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे श्रीरामपूर येथे भाजपला खिंडार पडलंय. या राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाष्य केलं आहे.

महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष पूर्ण करणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. त्यामुळे नजीकच्या काळात नगर जिल्ह्यातील भाजपचे अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा विश्वास प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मुंबई आमची आहे, मुंबईच्या वाट्याला जाऊ नका”

“एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला?”

‘सतर्कतेने दिवाळीचं स्वागत करा’; इकबाल सिंह चहल यांचं मुंबईकरांना आवाहन

“बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन”

…तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या