बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेसने ‘ते’ काम केलं म्हणून एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला”

धुळे | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं या संविधानाचे रक्षण करण्याचं काम काँग्रेसनं केलं म्हणून एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. शिरपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लोकशाही मान्य नाही कारण त्यांचा कारभार ठोकशाही पद्धतीने चालतो. केंद्रात सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींनी सर्व व्यवस्था मोडीत काढली आहे. देशाचे पंतप्रधान हे पद सर्वोच्च आणि सन्मानाचे पद आहे मात्र नरेंद्र मोदी यांनी या पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली असल्याचं म्हणत नाना पटोलेंनी मोदींवर टीका केली आहे.

मोदी सरकारने कोरोना संकटात देशातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिलं आहे. लोक तडफडून मरत असताना मोदी पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत होते. लसीकरण मोहिमेच्या अपयशाने मोदींचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. देशातील जनतेला लसींची गरज असताना मोदींनी पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राला मोफत लस दिली आणि देशातील लोकांना मात्र लस विकत घेण्यासाठी भाग पाडलं जात असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लसीकरण मोहिम फसली आहे मात्र प्रसिद्धीचा हव्यास लागलेल्या मोदींनी लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी कॉलेजमध्ये मोदींना धन्यवाद देणारे पोस्टर्स आणि होर्डींग्स लावण्याचे फर्मान काढलं आहे. लोकशाहीमध्ये फर्मान कसं काय काढलं जाऊ शकतं?, अस सवालही पटेलेंनी केला.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील एकमेव आमदार! कोरोना काळात केलेल्या कामामुळे निलेश लंकेंचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ ने सन्मान

आठ वर्षीय चिमुकलीनं स्वर्गाचा पत्ता टाकत लिहिलं दिवंगत वडिलांना पत्र!

“नरेंद्र मोदींची आता झोळी घेऊन जाण्याची वेळ आली”

‘या’ मंदिरात दर्शनासाठी लागणार लसीकरण प्रमाणपत्र!

पेरण्या खोळंबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; ‘या’ जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

Shree

Comments are closed.