बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीचा आपल्याच मित्राला दगा, काँग्रेसला खिंडार पाडत अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे | येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षा एकत्र सत्तेत आहेत. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीमधील पक्षांमधील नेते पक्ष बदलताना दिसत आहेत. अशातच पुण्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेसला दगा दिला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. माजी महापौर आणि ज्येष्ठ नेते शांतिलाल सूरतवाला, माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे , माजी नगरसेविका वैजयंती पासलकर, राजाभाऊ पासलकर, रमेश भांड ( उपाध्यक्ष पुणे शहर काँग्रेस ) आणि सलीम शेख यांनी घड्याळ हाती घेतलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांच्या नेतृत्त्वावर आणि विचारांवर विश्वास ठेवत आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचं प्रवेश केलेल्या नेत्यांनी व्यक्त केला. नेत्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढणार असून येत्या महापालिका निवडणुकीत सत्ता परिवर्तन मोहिमेला बळ मिळणार असल्याचं राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, गायक आणि नेते आनंद शिंदे आणि विरोधी पक्षनेते उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या- 

“अनिल देशमुखांना फरार घोषित करून त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा”

‘माझ्याशी लग्न का करत नाहीस?’; शहनाज सिद्धार्थचा ‘तो’ रोमँटिक व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

मुकेश अंबानींचा मोठा प्लॅन तयार, पहिल्यांदाच केला शेअर

‘देशात 8.5 टक्क्यांनी बेरोजगारी वाढली आहे’; राष्ट्रवादीची केंद्र सरकारवर टीका

कोरोना आणि गणेशोत्सवाबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More