बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारतासोबत अनेक विकसनशील देशांना लसनिर्मितीचा फॉर्म्यूला देऊ नये”, बिल गेट्स यांचं धक्कदायक वक्तव्य

नवी दिल्ली | सध्या देशात कोरोनारूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लसीकरण हे प्रभावी ठरत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 18 ते 45 वर्षामधील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरणाच्या या माहिमेसाठी मोठ्या प्रमाणात लसी लागतील. मात्र लस निर्मितीवरुन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते.

जगात अनेक औषधनिर्माण करणाऱ्या कंपन्या कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्मिती करत आहेत. सध्या जगातील लोक लसीच्या सुरक्षेबाबत अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे जगात सर्वांसोबत लसनिर्मितीचा फॉर्म्यूला शेअर केला जाऊ नये. लसनिर्मिती करणारी अमेरिकेची जॉन्सन अँड जॉन्सन आणि भारतात लस निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये मोठा फरक असल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.

बैद्धिक संपदा हक्का हा कायदा बाजूला केल्यामुळे जगातील सर्व देशांना कोरोना लस मिळण्यासाठी मदत होईल का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी लसीचा फॉर्म्यूला इतर देशांना देण्यात येऊ नये असं बिल गेट्स मुलाखतीदरम्यान म्हणाले.

दरम्यान, लस निर्मितीचा फॉर्म्यूला हा एखाद्या पाककलेसारखा नाही, जो कोणालाही देता येईल. इथे बौद्धिक संपदेच्या हक्काची गोष्ट नाहीये. तर येथे सुरक्षेचा मुद्दा आहे. लस तयार करताना काळजी घ्यावी लागते. टेस्टिंग तसेच ट्रायल करावे लागतात. तसेच लस तयार करताना खूप खबरदारी घ्यावी लागत असल्याचं बिल गेट्स यांनी सांगितलं. बिल गेट्स यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जागितक पातळीवर टीका होत आहे.

थोडक्यात बातम्या- 

इंदोरीकर महाराजांनी सांगितला कोरोनातून वाचण्याचा ‘हा’ खास उपाय

दिलदार गब्बर! मिशन ऑक्सिजनसाठी केलेली मदत ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

ATM सेंटरमधलं CCTV फुटेज व्हायरल, ‘या’ माणसाचा कारनामा पाहून सारेच हैराण

माज यालाच म्हणतात का?, कृणाल पांड्याच्या कृतीवर सोशल मीडियात एकच चर्चा

‘माझ्याकडून पैसे घेते आणि दुसऱ्यांशी बोलते’; संतापलेल्या प्रियकराने केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More