बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बार्सिलोना सोडल्यावर मेस्सी खेळणार ‘या’ क्लबकडून; कराराची रक्कम ऐकून व्हाल थक्क!

मुंबई | दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे चाहते जगभरात आहेत. भारतातही त्याच्या चाहत्यांची संख्या माेठ्या प्रमाणात आहे. अशातच मेस्सीने 17 वर्ष खेळत असलेला बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय घेतला होता. मेस्सीही क्लब सोडतानाच्या पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला होता. आता मेस्सी नवीन क्लबमध्ये सामील झाला आहे.

मेस्सी ज्या क्लबमध्ये सामील झाला आहे त्या क्लबकडून त्याला वर्षाला 257 कोटी मिळणार असल्याची माहिती समजत आहे. पॅरीस सेंट जर्मनसोबत मेस्सीचा करार झाला असून तो आता या क्लबसाठी खेळणार आहे. या क्लबमध्ये मेस्सीचा जुना मित्र नेयमार ज्युनियर आणि फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एमबापे हेसुद्धा आहेत.

34 वर्षींय फुटबॉलपटू मेस्सीने 17 वर्षांत 35 पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. तर बार्सिलोना क्लबकडून खेळताना त्याने 778 सामन्यात 672 गोल केले आहेत. पाच वेळा ‘फीफा प्लेअर ऑफ द इअर’ ही मेस्सीला मिळालं आहे. मेस्सीचा बार्सिलोना क्लबसाेबत 2017 साली 5 हजार 400 कोटींचा करार करण्यात आला होता आणि तो 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आला होता.

दरम्यान, मेस्सी बार्सिलोना संघात आता खेळणार नाही. एपसी बार्सिलोना संघ मेस्सीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी त्याला खुप खुप शुभेच्छा, असं बार्सिलोना क्लबने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आता कळलं ठाकरे सरकारमधील ‘हे’ मंंत्री येड्या सारखं का बडबडतात”

स्टेडियममध्ये सामना बघताना तरूणी पकडायला गेली चेंडू तितक्यात…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; अकरावीची प्रवेशपूर्व परीक्षा न्यायालयाकडून रद्द

खळबळजनक! मंत्रालयात सापडला दारूच्या बाटल्यांचा खच

आयुर्वेदाचार्य योगगुरू बालाजी तांबे यांचं निधन

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More