पुणे महाराष्ट्र

पुण्यात परतीच्या पावसाचं थैमान; अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, वीजही गायब

पुणे | पुणे जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं आहे. बुधवारपासून पाऊस सुरू असलेल्या पावसाने पुणे शहर आणि जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये पाणी तुंबलं असून घरांमध्ये पाणी शिरलं आहे.

वडगाव शेरी, रामवाडी, विमाननगर, कल्याणीनगर, सोपाननगर, चंदननगर, खराडी या भागातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. या भागात वीजही गेल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.

वडगाव बु. येथे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या पायथ्याजवळ असलेल्या ज्ञानगंगा सोसायटीत दोन भिंती कोसळल्या. सुदैवाने नागरिक जागेच असल्याने कुठलीही जीवीतहानी झालेली नाही. परिसरात पाणीच पाणी झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

परतीच्या पावसाने सोलापुरात हाहाकार; अनेक ठिकाणी पूरस्थिती

…तर सत्य बाहेर येणं महत्वाचं आहे- छगन भुजबळ

…अन् ‘मी लाभार्थी’ जाहिरातीचा खर्च भाजपकडून वसूल करा- सचिन सावंत

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा हक्कभंग दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या