Top News शेती

शेतकरी आंदोलनातील बरेच जण शेतकरी वाटत नाहीत; केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त विधान

नवी दिल्ली | नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनासाठी अजूनही सिंधू सीमेवर अडून बसले आहेत. जोपर्यंत सरकार हे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय. दरम्यान याविषयी एका केंद्रीय मंत्र्याने वादग्रस्त विधान केलंय.

केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी या शेतकरी आंदोलनातील बरेच जण शेतकरी वाटत नसल्याचं म्हटलंय. या विधानामुळे शेतकरी आंदोलनावरुन पुन्हा राजकीय वातावरण तापणार असल्याचं दिसतंय.

व्ही. के. सिंह म्हणाले, “जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे तेच केंद्र सरकारने केलंय. फोटोतील अनेकजण शेतकरी वाटत नाहीयेत. शेतकऱ्यांना कृषी कायद्याची काहीच अडचण नाहीये. ज्यांना आहे ते शेतकरी नसून इतर लोकं आहेत.”

दरम्यान या आंदोलनामागे विरोधी पक्षांबरोबरच कमिशन मिळणाऱ्या लोकांचाही हात असल्याचं, व्ही. के. सिंह यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

विराट बनला सर्वात वेगवान आणि सर्वात जलद; सचिनचाही विक्रम मोडला!

तुटवडा की छपाई बंद???; आता एटीएममध्ये मिळणार नाहीत ‘या’ नोटा!

मुंबईला मिळालेला बॉलिवूडचा दर्जा संपणार नाही- नवाब मलिक

तिसऱ्या वनडेत भारताचं ऑस्ट्रेलियाला 303 रन्सचं आव्हान; पंड्या-जडेजाची अर्धशतकी खेळी

“माझ्याकडे 13 एकर आहे… तुला काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या