’14 तारखेला अनेकांचे मास्क उतरवणार’; मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा
मुंबई | राज्यात सध्या अनेक मुद्द्यांनी राजकीय वातावरण पेटलं आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
14 तारखेला माझी सभा आहे, मला माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझ्या मनात काही तुबलेलं नाहीय पण मनात अनेक काही गोष्टी आहेत त्या बोलणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
कौतुकाची थाप मारणारे कमी आहेत बाकी थापा मारणारे जास्त आहेत. अच्छे दिन येतील असं म्हटलं होते, पण आता वाट बघतोय, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. बऱ्याच दिवसांनी मास्क न घालता बोलत आहे बऱ्याच दिवसांनी मास्क काढला. तसा मास्क काढायचा आहे तो 14 तारखेला काढायचा आहे, असंही ठाकरे म्हणाले.
दरम्यान, 14 तारखेला होणाऱ्या सभेला मुख्यमंत्री काय बोलणार, कोणते मुद्दे मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
“आता या सरकारचा बुरखा टराटरा फाडला पाहिजे”
मोठी बातमी ! टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण आग, अनेकजण जखमी
मोठी बातमी ! KGF फेम अभिनेत्याचं निधन, 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
“ओबीसी आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे लागलंय”
जेवण महागणार! गॅस तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागला
Comments are closed.