बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इथं फक्त सेक्स विकला जातो!; ‘या’ ॲप्सवरही अश्लील व्हिडीओंचा सुळसुळाट

मुंबई | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रांचने अश्लील व्हिडीओ तयार करुन ते प्रसारित केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमध्येच एकच खळबळ उडाली असून ओटीटीच्या माध्यमातून सिनेमांच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ तयार करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आगामी काळात अशाच काही ॲप्सवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

HOTShots App च्या माध्यमातून सिनेमांच्या नावाखाली पोर्न तसेच B ग्रेड कन्टेंट बनवण्याचं काम चालत होतं. यामध्ये अनेक न्यू कमर्स अभिनेत्रींना मोठ्या चित्रपटांमध्ये काम करण्याचं लालच दाखवून अश्लील व्हिडीओ तयार करुन घेतले जात होते. हे प्रकरण समोर येताच मुंबई क्राईम ब्रांचने अभिनेत्री गहन वशिष्टला अटक केली होती. अधिक तपास केला असता या उद्योगात राज कुंद्राचे पैसे गुंतले असल्याचं पोलिसांना समजलं.

दरम्यान, एकटं HotShotsच नाही तर अशा अनेक ॲप्सचा इंटरनेटवर सुळसुळाट झालेला पहायला मिळत आहे. स्वस्त नेट आणि चंगळवाद यामुळे पॉर्न तसेच सॉफ्ट पॉर्नकडे भारतीयांचा ओढा वाढत असल्याचं दिसत आहे. अशाच यूझर्सना आकर्षित करण्यासाठी या ॲप्सकडून प्रयत्न केले जात आहे. काही रुपये घेऊन महिन्याचं सबस्क्रीप्शन दिलं जात आहे यामध्ये कसलीही स्टोरी आणि त्यात सॉफ्ट पॉर्न किंवा पॉर्न विकलं जात आहे. या उद्योगाची हजारो कोटी रुपयांची उलाढाल असल्याचं अनेक ॲप्स सध्या अशा प्रकारे सेवा देत आहेत.

HotShots सोबत Hothit, NewFlix हे काही आणखी असे ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत जे आपल्या कन्टेंटमुळे वादात सापडू शकतात. या ULLU या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही अश्लील कन्टेन्ट असल्याचा आरोप केला जातोय. राज कुंद्रा प्रकरणात याआधी अटक केलेल्या अभिनेत्री गहन वशिष्टने निर्माती एकता कपूरचं नाव घेतलं होतं. एकता कपूरने ‘गंदी बात’ वेबसीरिज केली त्यासारखेच व्हिडीओ राज कुंद्रा बनवत असल्याचं तीनं म्हटलं होतं. त्यामुळे आता या प्रकरणात एकट्या राज कुंद्रावरच कारवाई होणार की इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही कारवाई होणार हे लवकरच समजेल.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडण्यास परवानगी मिळणार?

“तुम्हाला लाज वाटली पाहिजे खोटे आरोप करताना”, राज कुंद्रा प्रकरणात राखीची उडी

आजही मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुलीनं पोलीस ठाण्यात धाव घेत सांगितली आपबीती!

पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तासात धोधो पाऊस कोसळण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More