बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी शिवसेनेत राहू नये असं अनेकांना वाटतं’; पक्षांतर्गत वाद पेटला!

जळगाव | सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. एकिकडे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह चालल्याच्या चर्चा दबक्या आवाजात चालू आहेत. अशातच आता शिवसेना पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येऊ लागला आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वपक्षातील आमदार चिमणराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गुलाबराव पाटील आज जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, चिमणराव पाटील हे पारोळ्याचे आमदार आहेत. मी ज्येष्ठ आमदार असून स्थानिक पातळीवर माझे मत विचारात घेतले जात नाही. मला पक्षांतर्गत डावललं जात आहे.

गुलाबराव पाटलांना माझं या भागातील वर्चस्व सहन होत नाही. याच कारणाने 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत माझा ठरवून पराभव करण्यात आला. मला पक्षांतर्गत डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी शिवसेनेत राहू नये असं अनेकांना वाटतं, असा गंभीर आरोप चिमणराव पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, चिमणराव पाटील यांच्या या गंभीर आरोपांनंतर आता गुलाबराव पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यामुळे जळगावमध्ये आता गुलाबराव पाटील विरुद्ध चिमणराव पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या – 

सोन्याचा भाव आज पुन्हा वाढला, जाणून घ्या ताजे दर

“आरक्षण संपुष्टात आणणं हा भाजप आणि संघाचा डाव”

“देवाच्या काठीला आवाज नसतो शंभर अपराध भरले की फटका बसतोच, पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन कारखाना मिळवला”

“स्वच्छ चारित्र्याच्या चंद्रकांत पाटलांच्या पत्रानंतर जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई झाली, ही कारवाई राजकीय हेतूने आहे”

पवार कुटुंबाने अनेक कारखाने लाटलेत, रोहित पवारांचीही चौकशी करा- भाजप

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More