मुंबई | एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोठचिठ्ठी देत काल राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे यांनी एक मोठं विधान केलंय. या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
एकनाथ खडसे म्हणाले, “अनेक जणांची भाजप सोडण्याची इच्छा आहे. त्यांना रोखण्यासाठी पार्टीकडून राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार आहे असं सांगितलं जातं. परंतु राज्य सरकार पडणार नाही.”
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी हिने देखील राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.
पक्षप्रवेशादरम्यान बोलताना खडसे म्हणाले, “गेली 40 वर्षे ज्या निष्ठेने भाजपामध्ये काम केलंय त्याच निष्ठेने मी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करेन असा शब्द शरद पवार साहेब तुम्हाला देतो. राष्ट्रवादी पक्ष दुप्पट वेगाने वाढवेन आणि मी पक्षाचा विस्तार करून दाखवेन.”
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई- सिटी सेंटर मॉलचे दोन मजले जळून खाक; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट
“विरोधी पक्षनेत्यांनी आपले वजन वापरुन राज्याला विशेष मदत पॅकेज मिळवून द्यावं”
शिवसेनेच्या आमदाराकडून राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
नितिशकुमारांच्या योजनेमुळे बिहारमधील कोरोनाचा प्रादुर्भाव टळला- नरेंद्र मोदी