बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काबूल विमानतळावरील पाणी बॉटल आणि जेवणाची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

काबूल |  अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील नागरिक देश सोडून जात आहेत. अफगाणिस्तानमधून बाहेर जाण्यासाठी जवळपास अडीच लाख लोकांची विमानतळावर गर्दी झाली आहे. विमानतळावरची परिस्थिती इतकी भयानक झाली आहे की, माणसं भूकेने व्याकूळ होऊन विमानतळावरच मरताना दिसत आहेत.

काबूल विमानतळावर जेवण आणि पिण्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्याठिकाणी पाण्याच्या बाटलीची किंमत 40 डॉलर्स म्हणजेच 3 हजार रूपयाला मिळत आहेत. तर जेवणाच्या एका ताटाची किंमत 100 डॉलर्स म्हणजेच ती जवळपास 7 हजार 500 रूपयाला इतकी आहे. त्यामुळे विमानतळावर लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

जेवणाच्या वाढत्या किंमतीमुळे लोक भूकेपोटी विमानतळावर उन्हात उभे  आहेत. लोकांचे शरीर ही कमकुवत होत असुन बेशुद्ध पडत आहेत. आतापर्यंत भूकेने आणि तालिबानच्या भीतीमुळे विमानतळावर जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान,  अफगाणिस्तानमधून आतापर्यंत 82 हजार 300 लोकांना सुखरूप बाहेर काढले आहेत. तर जवळपास 6 हजार अमेरिकन सैनिक अफगाणिस्तान मध्ये आढळून आले आहेत.  तसेच अलिकडेच तालिबानने अमेरिकेला इशाराही दिला होता की, जर 31 ऑगस्टपर्यंत सैनिक अफगाणिस्तानमधून माघारी घेतले नाही तर परिणाम वाईट होतील.

 

थोडक्यात बातम्या-

अफगाणिस्तानमध्ये हाहाकार! काबूल विमानतळावर मोठा स्फोट

“तालिबानी आम्हाला काश्मीर प्रश्नावर मदत करणार आहेत”

“ओ लंके, 2 पावलं मागे नाही तर, 200 पावलं पुढे जात ठोकणार”

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथांना चपलेने मारण्याची भाषा केली- संजय राऊत

“शिवसेनेचे मर्द नाही बंद कार्यालयावर हल्ला म्हणजे गांडूपणा”

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More