महाराष्ट्र सांगली

मराठा मोर्चेकरी आक्रमक; कृष्णा नदीत जलसमाधी आंदोलन

सांगली | मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सांगलीत मराठा आंदोलकांकडून कृष्णा नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात येतंय.

मराठा मोर्चेकरी कृष्णा नदीच्या पाात्रात उतरले असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करत आहेत. तसंच या आंदोलनावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, मराठा मोर्चेकऱ्यांनी आज अनेक भागात बंदची हाक दिली आहे, ठिकठिकाणी दगडफेक, तोडफोड करत आंदोलन आक्रमक करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आंदोलनाला हिंसक वळण; वन विभागाची जीप पेटवली

-मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणं म्हणजे पळपुटेपणा!

-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!

-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले

-मराठा समाजाच्या असंतोषाला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील जबाबदार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या