औरंगाबाद महाराष्ट्र

हिंगोलीत मराठा आंदोलनकर्त्यांनी आमदाराला हुसकावून लावलं

हिंगोली | मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन अजूनच चिघळलेलेच आहे. हिंगोलीत आंदोलनाच्या जागेवर आलेले आमदार रामराव वडकुते यांना आंदोलकांनी हुसकावून लावले आहे.

मराठा आंदोलकांनी हिंगोली- नांदेड रस्त्यावर भंगार असलेला ट्रक पेटवून दिला आहे. उर्ध्व पैनगंगा कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली आहे. हिंगोलीच्या रस्त्यांवर झाडे टाकून आणि टायर जाळून रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आंदोलक हिंसक होऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यात तणावाचं वातावरण आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-नांदेडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण; 10 ते 15 पोलिस जखमी

-नरेंद्र मोदींच्या एका सहीने आयुष्य पालटलं; तरुणीला लग्नाच्या अनेक मागण्या

-राम मंदिराच्या विटांचं काय झालं?; राज ठाकरेंचा भाजपला सवाल

-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश

-मराठा आरक्षणासाठी चक्क दलित आमदाराचा राजीनामा! 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या