मराठा आंदोलनाच्या व्यासपीठावर सरकारचे मंत्री आणि विरोधक आमने-सामने

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे गेल्या 12 दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे. मात्र सरकारला आता जाग आली आहे. 

सहकार मंत्री सुभाष देशमुख उपोषणकर्त्यांना भेटायला गेले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे त्यांना आमने-सामने आले.

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना देऊ तसंच आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना 10 लाख रुपयांची मदत देण्याबाबत लवकर निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, मागील सरकारने आरक्षणाबाबत फसवलं म्हणून आमच्यावर विश्वास नसेल परंतु आम्ही आरक्षणाबाबत काही उपाययोजना केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार

-जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू!

-संघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही!

-महाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का?; शिवसेनेचा सरकारला सवाल

-राम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल