मुंबई | मराठा समाज आक्रमकपणे आंदोलन करत आहे. आज ठाणे रेल्वे स्टेशनवर मराठा आंदोलकांनी रेल्वेरोको आंदोलन केलं आहे.
आधी कल्याणकडे जाणाऱ्या लोकलपुढे हजारो मराठा कार्यकर्ते जमा झाले. जोरदार घोषणाबाजी करत लोकल अडवली. पोलिस त्यांची समजूत काढत त्यांना ट्रॅकवरून हटवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र दुसऱ्या बाजूला सीएसएमटीकडे निघालेल्या लोकलपुढे आंदोलकांच्या एका जमावाने ठाण मांडलं.
दरम्यान, ‘मुंबई बंद’ आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मात्र फटका बसला आहे.
ठाणे लोकल ट्रेनरोको pic.twitter.com/PO3qdpbDm1
— मराठा क्रांती मोर्चा (@RtMaratha) July 25, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं आहे- विनोद तावडे
-मराठ्यांच्या संतापाची लाट आता कोणीही रोखू शकत नाही- उद्धव ठाकरे
-सत्तेची चावी भाजपकडे द्या, मग तिजोरी उघडू- रावसाहेब दानवे
-मराठा समाजाबद्दल कसल्याही प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य केलेलं नाही!
-मराठा आक्रमक; ठाण्यात रस्तारोकोसाठी रोडवर टायर पेटवले