औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आंदोलक आमदार प्रशांत बंब यांच्यावर संतापले, ऑडिओ व्हायरल

औरंगाबाद | जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाला आहे तरी गंगापूरचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी अजून काकासाहेबच्या कुटुंबियांना भेट घेतली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक त्यांच्यावर संतापले आहेत.

सोशल मीडियावर प्रशांत बंब यांची आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात त्यांनी काकासाहेबच्या कुटुंबियांची विचारपुस का केली नाही?, पोलिस ठाण्यात माहिती घेण्यासाठी का आले नाही?, असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले आहेत. 

दरम्यान, मी तिथं आलो तर प्रकरण चिघळेल आणि राज्यात त्याचे पडसाद उमटतील, असं बंब यांनी म्हटलं आहे, असा संवाद या क्लिपमध्ये आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

-मराठा मोर्चानं आणखी एक मागणी वाढवली, ‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!’

-मराठा मोर्चेकऱ्यांकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या