औरंगाबाद | आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तीव्र संताप निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय.
मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरलेत. मराठ्यांना केवळ आश्वासनांवर झुलवत ठेवण्यात आलं. त्यामुळे मूक मोर्चे काढणाऱ्या मराठ्यांचा संताप आता बाहेर पडत आहे.
दरम्यान, पंढरपुरात सोप सोडण्याच्या वक्तव्यावरुन मराठा समाजामध्ये संताप पहायला मिळतोय. मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय. काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनंतर ही मागणी आणखी जोर धरु लागलीय.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणं कितपत योग्य?; उपराष्ट्रपतींचा सवाल
-उद्या मुंबई बंद; मराठा क्रांती मोर्चाची घोषणा
-मराठा आमदारांविरोधात तीव्र संताप; श्रद्धांजलीचे फोटो व्हायरल
-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना फोटो व्हायरल
-मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू
-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी