बारामती | मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण हवे आहे. राजकीय आरक्षण नको, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितलं. ते पत्रकारांशी बोलत होते.
आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिले होते. हे आरक्षण देताना 52 टक्केच्या आरक्षणाला धक्काही लागू दिला नव्हता, असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, तेव्हा नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यावेळेस झालेल्या चर्चेनुसार मराठा समाजाला नोकरी व शिक्षणासाठी आरक्षण हवे असून राजकीय आरक्षण नको, असं सांगण्यात आले होतं, असं त्यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-समाजात प्रचंड असंतोष असूनही भाजपला विजय मिळतो कसा?- उद्धव ठाकरे
-शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या मराठा तरुणाला बेदम मारहाण
-मराठा मोर्चेकऱ्यावर धावून जाणाऱ्या अंबादास दानवेंना मोर्चेकऱ्यांनी हुसकावून लावलं
-राज्यात पेटलेल्या मराठा वणव्यास सरकारच जबाबदार- विखे-पाटील
-फडणवीस यांच्या विरोधात वैयक्तीक घोषणा नको; अजित पवारांची मोर्चेकऱ्यांना ताकीद