बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात मराठ्यांचा एल्गार; विभागीय कार्यालयासमोर चक्री आंदोलनाला सुरूवात

पुणे | मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुण्यातील विभागीय कार्यालयाबाहेर चक्री आंदोलनाला सुरूवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने येऊन मराठा समाजाचे कार्यकर्ते बेमुदत चक्री उपोषणात सहभागी होणार आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 आॅगस्टपासून चक्री आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला होता. त्यामुळे पुण्यात चक्री आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मराठा समाज सातत्याने आक्रमक होत आहे, अगोदर मुक मोर्चे, त्यानंतर ठोक मोर्चे आणि आता पुन्हा चक्री आंदोलनाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचा विचार करावा अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येतेय.

महत्त्वाच्या बातम्या-

-केरळसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; आमदार-खासदार देणार एका महिन्याचं वेतन

-‘दबंग 3’ बाबत मोठी घोषणा; सलमान खानसोबत अभिनेत्री ‘ही’ झळकणार

-कौतुक म्हणून माझा एकही फ्लेक्स लावला नाही- दिवाकर रावते

-लग्न जवळ आलं असताना दीपिकाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंडसोबतचा फोटो

-हा मोठा क्रिकेटपटू भाजपच्या गळाला?; दिल्लीतून लोकसभा लढवण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More