मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाचा बारावा दिवस; एकाची प्रकृती गंभीर

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे उपोषण आझाद मैदानावर सुरु आहे. या उपोषणाचा बारावा दिवस आहे तरी सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. 

आंदोलकांची प्रकृती ढासळत आहे. एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर आरक्षणाची मागणी मान्य करावी, असं मराठा क्रांती मोर्चाकडून म्हटलं आहे.

आंदोलनादरम्यान कोणाचे बरं-वाईट झाल्यास सरकारच त्याला जबाबदार असेल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. आंदोलनाचे नेतृत्त्व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संभाजी पाटील हे करत आहेत. 

दरम्यान, मागण्या लवकर पुर्ण न झाल्यास 16 नोव्हेंबरपासून राज्यातील मराठा बांधव मुंबईत दाखलं होईल. त्यानंतर वर्षा, मंत्रालय आणि आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होईल, असं कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू!

-संघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही!

-महाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का?; शिवसेनेचा सरकारला सवाल

-राम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

-सत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे