बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘संभाजीराजेंचं नेतृत्व नको’, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

मुंबई | आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा सन्मान करतो मात्र छत्रपती संभाजीराजे (sambhaji raje) यांचं आम्हाला नेतृत्व मान्य नसल्याचं मराठा क्रांती मोर्चाने ठणकावून सांगितलं आहे.

राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीत छत्रपती संभाजी राजेंनी समनव्यकांना बोलू न दिल्याने औरंगाबादेतील मराठा क्रांती मोर्चाच्या समनवयकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तुम्ही तुमच्या बैठका रात्रीच्या अंधारामध्ये घेतात, काय चाललंय काय नेमकं? सर्व व्यापक बैठक का होत नाही, लोकांना बोलावून बैठक घेतात आणि व्यापाक बैठकीचे स्वरूप देतात. मोजकेच लोक गोळा करता. मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व कुणीही नाहीये. औरंगाबादमधून मोर्चाला सुरुवात झाली आम्ही त्या मोर्चाचे शिलेदार आहोत. जोपर्यंत आमच्यासोबत चर्चा होत नसेल तर तुम्हाला पळताभुई थोडी होईल. अशी अवस्था केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही समन्वयकांनी दिला.

 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More