मुंबई | मराठा क्रांती मोर्चाच्या विरोधामुळे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या शासकीय पूजेला जाणं टाळलं, मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्यामुळे मराठा समाजात संताप निर्माण झाला आहे.
पोलिसांनी काही मेसेज ट्रॅप केले आहेत. त्यामध्ये वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याची भाषा आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. या वाक्यामुळे मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आलाय.
मराठा समाजाने आतापर्यंत शांततेत मूक मोर्चे काढले. वारकरी हे आमचे बांधव आहेत आणि त्यांना इजा होईल अशी कुठलीही गोष्ट मराठा समाज करणार नाही. मराठा समाजाची बदनामी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी आता होत आहे.
पाहा नेमकं काय म्हणाले होते मुख्यमंत्री-
महत्त्वाच्या बातम्या–
-पहिल्यांदाच या देशात जाणार भारतीय पंतप्रधान, 200 गायी देणार भेट!
-चिघळणाऱ्या मराठा आंदोलनास भाजप सरकारच जबाबदार- नारायण राणे
-मराठा मोर्चाच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
-तो व्हीप शिवसेनेच्याच दोन खासदारांनी टाईप केला होता?
-9 ऑगस्टपासून मराठा समाजाचं ‘करेंगे या मरेंगे’; बंदची हाक