महाराष्ट्र मुंबई

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, आंदोलनाच्या तारखा केल्या जाहीर

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकार आणि विरोधी पक्षावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक घेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यभर आंदोलन होणार आहे. मात्र एकाच दिवशी संपुर्ण राज्यात हे आंदोलन होणार नाही. विविध जिल्ह्यात विविध दिवशी आंदोलन होणार आहे. तसेच आंदोलनादिवशी बंदची हाक दिली जाणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितलं आहे.

येत्या एकवीस तारखेला म्हणजे 21 सप्टेंबरला सोलापूर जिल्हा बंद आणि आंदोलनाची हाक दिली आहे. तर 20 तारखेला मुंबईत ठिकठिकाणी ठिय्या आंदोलनाची शक्यता आहे आणि 17 सप्टेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन केली जाणार असल्याची माहिती समजत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी येत्या 23 सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषदेचं आयोजन केलं जाणार असल्याचं सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ माजी आमदाराचा अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा जाहीर

पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही

…म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडला- उर्मिला मातोंडकरआरोग्यमंत्री राजेश टोपे शिरुरमध्ये थांबले असताना चौकशी दरम्यान आला ‘हा’ प्रकार समोर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या