महाराष्ट्र मुंबई

‘आता तुम्हीच मार्ग काढा’; मराठा आंदोलक शरद पवारांची घेणार भेट

मुंबई | शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे. त्यांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही यापूर्वीही मराठा आंदोलकांकडून करण्यात आली होती. आता आम्ही लवकरच शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी सांगितलंय.

शरद पवार यांनी राज्यात तीन पक्षांना एकत्र आणून सरकार स्थापन केलं. तसेच आता त्यांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

सरकारी नोकरभरतीत मराठा समाजाच्या जागा रिक्त ठेवून प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी केली जात आहे. हा म्हणजे मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. हे आम्ही कदापि होऊ देणार नाही, असं आबा पाटील यांनी म्हटलंय.

दरम्यान, आरक्षण कधी मिळणार, याची कालमर्यादा निश्चित झाली पाहिजे. एक तर सरकारने ही उपसमिती बरखास्त करावी. अन्यथा या उपसमितीवर जबाबदार आणि काम करणाऱ्या लोकांची नियुक्ती करावी, अशी मागणी आबा पाटील यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे- राजेश टोपे

‘कोणाच्या जिवावर माज करतात’; प्राजक्ता गायकवाडवर अलका कुबल भडकल्या

“…तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही”

“मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचं काही राजकीय पक्षाचं षडयंत्र”

’14 वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले’; आमिर खानच्या मुलीचा धक्कादायक गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या