मराठे मागण्या मान्य होईपर्यंत मुंबईत चक्काजाम करणार!

कोपर्डी

अहमदनगर | सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईत ९ ऑगस्टला महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मागण्या मान्य होईपर्यंत मुंबईत चक्काजाम करण्यात येणार आहे.

कोपर्डीच्या घटनेला १ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने कोपर्डीत श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

९ ऑगस्टचा मोर्चा मूक असावा की ठोक असावा यावरुन काही काळ बैठकीत तणाव निर्माण झाला होता. मात्र चक्काजामचा निर्णय झाल्यानंतर हा तणाव निवळला.