Top News

मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्त्व आता खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे?

पुणे | मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्त्व खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वीकारावं अशी अनेक मराठा संघटनांची विनंती होती. उदयनराजे यांनी ती विनंती मान्य केल्याची माहिती आहे. 

मराठा समाजाच्या काही संघटनांनी आज पुण्यात उदयनराजे यांची भेट घेतली. त्यावेळी आपण मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्त्व करण्यास तयार असल्याचं उदयनराजेंनी स्पष्ट केल्याचं कळतंय. 

उदयनराजे आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या इतर नेत्यांशी बोलून ते मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं कळतंय. मराठा आरक्षणाबद्दल ठोस भूमिका मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असंही उदयनराजेंनी म्हटलंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी मराठा रणरागिणी लाटणं घेऊन रस्त्यावर…

-अयोध्या-वाराणसीच नव्हे पुढे हिमालयात जा; राणेंचा उद्धव ठाकरेंना सल्ला

-मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-हिंगोलीत मराठा आंदोलनकर्त्यांनी आमदाराला हुसकावून लावलं

-नांदेडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण; 10 ते 15 पोलिस जखमी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या